खंडाळा - दिवाळी लेख

खंडाळा - दिवाळी लेख
Published on: 

विश्वासाच्या जोरावर यशस्‍वी वाटचाल
....................................
‘स्वरूप डेव्हलपर्स’चे
प्रेरणादायी
नामदेव बरकडे
..................................
आपल्याला हक्काचे घर किंवा स्वतःच्या मालकीचा प्लॉट घ्यायचा आहे, मग जागा निवडताना विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शक व्यवहार यांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. याच विश्वासाच्या बळावर अल्पावधीतच गृहबांधकाम आणि प्लॉटिंग व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे ‘स्वरूप डेव्हलपर्स’! नामदेव बरकडे यांनी सुरू केलेल्या स्वरूप डेव्हलपर्सने खंडाळा, शिरवळ आणि लोणंद परिसरात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
- अशपाक पटेल
.......................................................
खंडाळा तालुक्‍यातील हरळी येथील बरकडे यांनी संघर्ष, जिद्द, दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या या वाटचालीचा प्रवास नवपिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतो.
नामदेव बरकडे यांचे प्राथमिक शिक्षण हरळी येथे, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण खंडाळा येथे झाले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी पुण्यातून पूर्ण केले. मुलाने उच्च शिक्षण घ्यावे, ही आई-वडिलांची प्रबळ इच्छा आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हीच त्यांच्या यशस्वी प्रवासाची खरी प्रेरणा ठरली.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना, शेळ्या- मेंढ्या आणि शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, या परिस्थितीने त्यांची शिक्षणाची जिद्द कमी झाली नाही. उलट परिस्थितीवर मात करण्याची ऊर्मी अधिकच वाढली. बारावीपासून पदवीपर्यंत अकाउंट्स विषयात त्यांनी बोर्ड, जिल्हा आणि पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले.

बहुराष्ट्रीय कंपन्यांतील अनुभव
सन २००० ते २०२१ या कालावधीत त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले. या काळात व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, व्यवहारातील पारदर्शकता आणि व्यावसायिक शिस्त यांचा मोठा अनुभव त्यांना मिळाला. मात्र, स्वतःचा व्यवसाय उभारण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती.
बिल्डिंग ॲण्ड डेव्हलपमेंट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला. यासाठी श्रीपाद जाधव साहेब यांच्याकडून त्यांना विशेष प्रेरणा मिळाली. नातेवाईक सुरेश धायगुडे, किसन बरकडे तसेच मित्रपरिवाराच्या साथीने त्यांनी २०१३ मध्ये स्वरूप डेव्हलपर्सच्या माध्यमातून व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

संकटांना संधी मानणारा उद्योजक!

व्यवसायाची वाटचाल सुरू असतानाच नोटाबंदी, रेरा कायद्याची अंमलबजावणी, आर्थिक मंदी आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. विशेषतः कोरोना काळात बांधकाम क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योजकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, बरकडे यांनी संकटासमोर हार न मानता संयम आणि दूरदृष्टीने परिस्थितीचा सामना केला. ग्राहकांशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. ग्राहकांचे हित जपणे, दिलेला शब्द पूर्ण करणे आणि हाती घेतलेला प्रकल्प वेळेत पूर्णत्वास नेणे या तत्त्वांवर त्यांनी भर दिला.
२०१७-१८ च्या आर्थिक मंदीच्या काळातही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक अडचणी असूनही प्रकल्प पूर्ण करून ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या सदनिका सुपूर्द केल्या. याच काळात त्यांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला. पुढे २०२१ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला.

व्यवसायासोबत
सामाजिक बांधिलकी

नामदेव बरकडे यांचे व्यक्तिमत्त्व केवळ यशस्वी व्यावसायिक एवढ्यापुरते मर्यादित नाही. खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यांना नेहमीच अस्वस्थ करतो. तालुक्यातील शेतीला शंभर टक्के पाणी मिळावे, या उद्देशाने नीरा- देवघर व धोम- बलकवडी सिंचन योजनांच्या पाण्यासाठी त्यांनी जनचळवळ उभी केली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल न लावता केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहितासाठी काम करण्याची त्यांची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. याशिवाय आध्यात्मिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत समाजात चांगले विचार, संस्कार आणि सामाजिक सलोखा रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

दूरदृष्टीपूर्ण संकल्प
येत्या पाच वर्षांत खंडाळा, शिरवळ आणि लोणंद या विकसित होत असलेल्या शहरांमध्ये गृहप्रकल्प आणि प्लॉटिंग क्षेत्रात स्वरूप डेव्हलपर्सचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार आधुनिक सुविधा असलेले मोठे गृहप्रकल्प उभारण्याची त्यांची योजना आहे.
नवयुवकांना संदेश देताना ते म्हणतात, की आजच्या तरुणांनी नोकरीच्या संधींबरोबरच उद्योग-व्यवसायाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बांधिलकीही जपली पाहिजे. विशेषतः खंडाळा तालुक्यात भविष्यात शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेता तरुणांनी शेतीकडेही पूरक व्यवसाय म्हणून पाहावे आणि शेतीला प्राधान्य द्यावे.
शिक्षणातून मिळालेली जिद्द, नोकरीतून मिळालेला अनुभव, संकटांतून मिळालेली शिकवण आणि समाजकार्यातून मिळालेली आत्मिक समाधानाची अनुभूती... या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे नामदेव बरकडे यांचा प्रवास!
हरळीच्या मातीतून उगवलेले हे उद्योजक आज व्यवसायाच्या माध्यमातून खंडाळा, शिरवळ आणि लोणंद परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. विश्वास, गुणवत्ता आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर ‘स्वरूप डेव्हलपर्स’ भविष्यातही यशाची नवनवी शिखरे गाठेल, यात शंका नाही.
.......................................


फोटो - १७ जून २०२५ अंकातील फोटो घ्या
आयकार्ड + बिल्डिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com