

मार्केट ट्रेण्ड ः नामदेव उमाजी ॲग्रिटेक
---------------------------------
‘नामदेव उमाजी ॲग्रिटेक’चा १४० वा वर्धापन दिन साजरा
कर्जत ः येथे भारतातील कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बियाणे उत्पादक कंपनी ‘नामदेव उमाजी ॲग्रीटेक इंडिया प्रा. लि. या कंपनीने नुकताच आपला १४० वा वर्धापन दिन साजरा केला. १८८५ मध्ये छोट्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आज ५ व्या पिढीच्या कुशल नेतृत्वाखाली देशभरातील १० पेक्षा अधिक राज्यांमध्ये विस्तारला आहे.
या वेळी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन भालंगे म्हणाले, की १८८५ मधील एका छोट्या दुकानापासून सुरू झालेला प्रवास आज १४० व्या वर्षात पोहोचला आहे. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचे कल्याण व समृद्धी हे मुख्य ध्येय ठेवल्यामुळे शेतकऱ्यांनीही पिढ्यान् पिढ्या आमच्यावर विश्वास दाखवला आहे. तीच आमची खरी ताकद आहे. कंपनीचा ‘पिरॅमिड सीड्स’ हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला असून, कंपनी ISF, APSA, NSAI आण SIAM या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बी-बियाणे संघटनांमध्ये सक्रिय प्रतिनिधित्व करत आहे.
तर पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे श्लोक भालंगे (संचालक, संशोधन आणि व्यवसाय विकास) म्हणाले, की आजच्या आधुनिक युगामध्ये बियाणे गुणवत्ता जपण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आमचे संशोधन आणि विकास केंद्राला केंद्र सरकारच्या DSIR ची मान्यता मिळालेली आहे. पिकांच्या वाणांची निर्मिती करताना उत्पादन वाढीसोबतच त्यांच्या पोषक मूल्यामध्ये वाढ करण्यासाठी संशोधन केले जात आहे.
या कार्यक्रमासाठी सौ. राजश्री भालंगे (संचालिका), गणेश लाडकत (संचालक - विक्री आणि विपणन), आणि सिद्धांत भालंगे (‘उगाओ’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी) यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.