मलकापूर नाना यांनी पार्क साठी पत्र
मलकापुरात नाना-नानी पार्क करा विकसित
नगरसेवक माऊर; मुख्याधिकाऱ्यांकडे केली पत्राद्वारे मागणी
मलकापूर, ता. ३ : येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये नमो उद्यान योजनेंतर्गत नाना- नानी पार्क विकसित करावे, अशी मागणी नगरसेवक भीमाशंकर माऊर यांनी मुख्याधिकारी कपिल जगताप यांना पत्राद्वारे केली.
पत्रात म्हटले, की वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगरपालिका क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यास मान्यता देण्याबाबत १७ सप्टेंबर २०२५ ला शासन निर्णय झाला आहे. १ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत येथील नगरपालिकेस एक कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्यामधून नगरपालिकेस शहरांमध्ये विविध ठिकाणी उद्याने तयार करण्यास वाव आहे. यामध्ये चांगली कामगिरी केल्यास नगरपालिकेस शासनातर्फे अजून बक्षीस रक्कम प्राप्त होऊ शकते.
प्रभाग क्रमांक दोनचा सदस्य म्हणून प्रभाग क्रमांक दोन येथे तुळजाईनगर येथील मंजूर लेआउटमधील सर्व्हे क्रमांक २९१/अ/एक/क मधील २२६.८७ चौरस मीटरची खुली जागा, तसेच दत्तनगर येथील मंजूर लेआउटमधील सर्व्हे नं. २८८/३/अ/ मधील ४५०.४८ चौरस मीटरची खुली जागा आहे. या जागेत नमो उद्यान योजनेंतर्गत नाना-नानी पार्क म्हणून विकसित करण्यात यावी. या पार्कमुळे प्रभागातील ज्येष्ठांना व्यायामासाठी, तसेच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येईल.
A01266
भीमाशंकर माऊर
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

