स्मशानभूमीतील त्या ''काळरात्री'' संपल्या... ''नाम''च्या संवेदनशीलतेने उभं राहिलं हक्काचं घर; नानांच्या निधनाने ढाळेवाडीतील दिव्यांग कुटुंब पोरकं!

स्मशानभूमीतील त्या ''काळरात्री'' संपल्या... ''नाम''च्या संवेदनशीलतेने उभं राहिलं हक्काचं घर; नानांच्या निधनाने ढाळेवाडीतील दिव्यांग कुटुंब पोरकं!
Published on: 

MHD26B05592
ढाळेवाडी (ता. सांगोला) : येथील सोनवणे कुटुंबाला ‘नाम’ बांधून दिलेले पक्के घर.

स्मशानभूमीतील त्या ‘काळरात्री’ संपल्या...
‘नाम’मुळे मिळालं हक्काचं घर; नानांच्या निधनाने ढाळेवाडीतील दिव्यांग कुटुंब पोरकं!

महूद, ता. ८ : अंगावर शहारे आणणारा कडाक्याच्या थंडीचा कडाका असो, तळपणारे ऊन असो किंवा रात्री-अपरात्री येणारा मुसळधार पाऊस... उघड्यावर संसार थाटलेल्या ढाळेवाडी (ता. सांगोला) येथील एका हताश दिव्यांग कुटुंबासाठी प्रत्येक रात्र म्हणजे एक ‘काळरात्र’च होती. ढाळेवाडी येथील शासकीय जागेवर सोनवणे कुटुंब कित्येक वर्षांपासून उघड्यावर राहून पाचवीला पुजलेल्या दारिद्र्याशी संघर्ष करत होते. डोक्यावर पक्के छप्पर नसल्याने पावसाच्या रात्रींमध्ये चक्क नजीकच्या स्मशानभूमीचा आसरा घ्यावा लागणाऱ्या या सोनवणे कुटुंबाच्या पाठीशी जेव्हा अख्खी दुनिया उभी राहू शकली नाही, तेव्हा ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर धावून आले. अवघ्या १५ दिवसांत या कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचे टुमदार घर उभे राहून त्यांच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर झाला होता. आज नानांच्या अचानक निघून जाण्याने स्मशानभूमीच्या छायेतून बाहेर पडून सुखाचा श्वास घेणारे हे कुटुंब आणि परिसरातील कार्यकर्ते अत्यंत भावूक झाले असून, त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.
२०१८ मधील ही आठवण आजही ढाळेवाडीतील गावकऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात लख्ख जिवंत आहे. एका अनोळखी, उघड्यावर पडलेल्या दिव्यांग कुटुंबाच्या दुःखावर नानांनी ज्या तत्परतेने मलम लावले, त्या संवेदनशीलतेला संपूर्ण परिसराने मनापासून सलाम केला होता.
आज नाना पाटेकर आपल्यात उरले नाहीत. पण ढाळेवाडीत उभे असलेले ते छोटेसे घर आणि त्या घरात सुरक्षित झोपणारे सोनवणे कुटुंब आजही प्रत्येक श्वासात नानांचे आभार मानत आहे. ‘नाना गेले, पण आमच्या डोक्यावरचे छप्पर आणि पाठीवरचा तो आपुलकीचा हात आम्हाला जन्मभर आठवत राहील,’ अशा शब्दांत ढाळेवाडीतील गावकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com