Pune Crime : पुण्यातील नाना पेठेतील अनधिकृत मासळी दुकाने बंद; बाजारातील ५० दुकाने बंद
Pune Updates : नाना पेठ मासळी बाजारातील अनधिकृत दुकांनांवर पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे ५० दुकाने बंद केली असून काही दुकानांवर आंदेकर टोळीचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पुणे : नाना पेठेतील मासळी बाजारातील अनधिकृत दुकानांवर समर्थ पोलिसांनी कारवाई केली. त्यात काही दुकाने आंदेकर टोळीच्या हस्तकांकडून चालविण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय होता.