पुणे : नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे आढळून आल्याने ‘डीजीसीए’ने (नागरिक हवाई वाहतूक महासंचालनालय) नांदेड विमानतळ प्रवासी सेवेसाठी बंद केले आहे. परिणामी, नांदेड विमानतळावरची विमानसेवा पूर्णपणे थांबली आहे. याचा थेट फटका पुण्याहून नांदेडला जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. स्टार एअरची पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. ‘डीजीसीए’च्या आदेशानंतर धावपट्टीचे काम सुरु झाले आहे.