

नांदेडला ५१ डेपोचे
वीज कनेक्शन खंडित
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई; २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडले
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : दुष्काळसदृश परिस्थिती पाण्याचा अनधिकृत वापर व अपव्यय रोखण्यासाठी महसूल, पोलिस व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत गोदावरी नदीवरील रहाटी, जैतापूर, सोमेश्वर, पिंपळगाव को., बोरगाव ते., थुगाव, मार्कड, पिंपळगाव निमजी, कल्लाळ, विष्णुपुरी आणि कोटीतीर्थ येथील एकूण ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले. यासोबतच विविध ठिकाणी पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शनही तोडण्यात आले आहेत.
नांदेड शहरासह गोदावरी नदीकाठावरील गावांना भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित राहावा, यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अनधिकृत वापर व अपव्यय रोखण्यासाठी महसूल, पोलिस व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान रहाटी, जैतापूर, सोमेश्वर, पिंपळगाव को., बोरगाव ते., थुगाव, मार्कड, पिंपळगाव निमजी, कल्लाळ, विष्णुपुरी आणि कोटीतीर्थ येथील एकूण ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शनही तोडण्यात आले. या कारवाईमुळे जलाशयातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यास मदत होणार असून, उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत करण्यात आली. ए. बी. सिंगणवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, एएसआय रामराव ढोले, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, पोलिस उपनिरीक्षक रामराव केंद्रे तसेच एम. एफ. बागवान यांच्या पथकाने कारवाई केली. मंडळ अधिकारी मधुकर फुलवले, पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.
पाणी उपशाविरोधातील कारवाई सुरू राहणार
नांदेड शहर तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी अनधिकृत पाणी उपशाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.