पुणे - बंगळुरु 'हायवे'वर 'बर्निंग कार'चा थरार! 'नॅनो कार'ने अचानक घेतला पेट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

अजय बाबरन्स हे साताऱ्याकडून मुबईच्या दिशेने (MH-15 कमी 1853) या नॅनो कारने आपली पत्नीसह चालले होते.  दुपारी सव्वा दोन वाजता वारजे येथील डुक्कर खिंड जवळील उड्डाण पुलावर आले असता.त्यांच्या गाडीतून पुढच्या ढिकीतून धूर येताना चालक अजय यांस दिसला. त्यांनी गाडी तात्काळ पुलावर थांबवली आणि नागरिकांच्या साहाय्याने गाडीतून बाहेर पडला. थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला. यामध्ये त्याची नॅनो कार पूर्णपणे जळाली.  
 
वारजे : पुणे - बंगळुरु महामार्गावर डुक्कर खिंडीच्या जवळील पुलावर नॅनोने कारने अचानक पेट घेतला आणि कार पुर्णपणे जळाली. ड्रॉयव्हर आणि प्रवासी वेळीच कार बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवारी (ता.18) दुपारी सव्वादोन वाजता हा प्रकार घडला.
 
अजय बाबरन्स हे साताऱ्याकडून मुबईच्या दिशेने (MH-15 कमी 1853) या नॅनो कारने आपली पत्नीसह चालले होते.  दुपारी सव्वा दोन वाजता वारजे येथील डुक्कर खिंड जवळील उड्डाण पुलावर आले असता.त्यांच्या गाडीतून पुढच्या ढिकीतून धूर येताना चालक अजय यांस दिसला. त्यांनी गाडी तात्काळ पुलावर थांबवली आणि नागरिकांच्या साहाय्याने गाडीतून बाहेर पडला. थोड्याच वेळात गाडीने पेट घेतला. यामध्ये त्याची नॅनो कार पूर्णपणे जळाली.  
 
अग्निशामक केंद्राची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान काही काळ महार्गाावर वाहतूक कोंडी झाली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nano car suddenly caught fire On the Pune Bangalore highway

टॉपिकस
Topic Tags: