दिवाळी सणाचे मुहूर्त बातमी

दिवाळी सणाचे मुहूर्त बातमी
Published on: 

नरक चतुर्दशी अन्
लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

रविवारी अभ्यंगस्नान, लक्ष्मी-कुबेर पूजन; १० ला पाडवा, तर ११ ला भाऊबीज

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १ : यंदा दिवाळीतील नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण रविवारी (ता. ८) एकाच दिवशी आले आहेत. दिवाळीच्या सणांना ५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० हा शुभमुहूर्त आहे.
दिवाळीची सुरुवात गुरुवारी (ता. ५) वसुबारसने होईल. या दिवशी सवत्स गायीचे पूजन केले जाते. शुक्रवारी (ता. ६) धनत्रयोदशी असून, आरोग्याचे दैवत धन्वंतरीचे पूजन आणि यमदीपदान केले जाते. अकाली मृत्यू टाळण्यासाठी सायंकाळी दक्षिण दिशेला ज्योत करून दिवा लावण्याची परंपरा आहे. रविवारी (ता. ८) नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली जाते. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० हा मुहूर्त आहे.
बुधवारी (ता. ११) भाऊबीज साजरी होणार असून, बहिणीने भावाला औक्षण करून भोजनासाठी आमंत्रित करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या या सणांमुळे घराघरांत आनंद, उत्साह आणि स्नेहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

चौकट...
वहीपूजनाचे मुहूर्त
मंगळवारी (ता. १०) बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा होईल. या दिवशी बळीराजाचे पूजन, व्यापारी वर्गाकडून वहीपूजन आणि पती-पत्नीने एकमेकांना औक्षण करण्याची परंपरा आहे. वहीपूजनासाठी पहाटे २.१० ते ५.१०, सकाळी ६.३५ ते ७.२५ आणि सकाळी ११ ते दुपारी २ हा मुहूर्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.