गंभीर गुन्ह्यांची उत्कृष्ट उकल केल्याबद्दल पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
TMB26B03798
सोलापूर ः टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम.
टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक पवार यांचा सन्मान
टेंभुर्णी, ता. ३ : गंभीर गुन्ह्याची उकल केल्याबद्दल टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दाखल झालेल्या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अरण येथील अल्पवयीन मुलाचा त्यांच्या भावकीतील मुलांनी खून केला होता. या गुन्ह्याचा उत्कृष्टपणे तपास करून गुन्ह्याच्या तपासात साखळी पूर्ण करून दोन आरोपी अटक करून त्यांच्यावर दोषारोप पत्र पाठवले आहे.
भीमानगर येथे बार्शी येथील भाऊ दारू पिऊन त्रास देतो म्हणून बार्शी येथून भीमानगरला आणून त्याचे डोक्यात दगड घालून खून केला होता. याची कायदेशीरीत्या तपास करून तत्काळ गुन्हा उघडकीस आणून एक सख्खा भाऊ व एक मावस भाऊ व इतर असे आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
एका महिलेने कारमध्ये बेंबळे चौक येथे बसवून तिला पुढे सोडतो असे सांगून तिचे डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. यातील चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत करून दोघांना अटक करून दोषारोप पत्र पाठवले. या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सन्मानित करण्यात आले. याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

