

पुणे, ता. १९ : नारायण पेठेतील वि. रा. वेलणकर हायस्कूलच्या १९८३ ते १९९६ या बॅचमधील माजी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. वेलणकर कट्टा ग्रुपच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रावसाहेब पटवर्धन सभागृहात झाला. तब्बल ३० वर्षांनंतर शिक्षक, शिपाई, मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने वातावरण आनंदमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, आरती, शिवगर्जना, राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत सर्व शिक्षकांचा गौरव केला, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व शाळेचे बॅच प्रदान करण्यात आले. आयोजनासाठी मारुती नगीने, पोपट कंधारे, अभिजित शिरसेकर, तुषार कुलकर्णी, सुरेश शिंदे आदींनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.