नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम यावर्षी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे वीस टक्के द्राक्ष बागेत घडनिर्मितीच झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीस टक्के बागेतील घड जिरल्यामुळे अल्प घडनिर्मिती झाली असून घडाचा आकार लहान आहे.