Narayangaon Theft : नारायणगाव बसस्थानकात ज्येष्ठ महिलेचे ५ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला; जागरूक पत्रकाराच्या मदतीने पोलिसांनी एका तासात आरोपी पकडला

Jewellery Theft Solved: नारायणगाव बसस्थानकात ज्येष्ठ महिलेची सोन्याचे दागिने आणि मोबाईल असलेली पिशवी चोरीला गेली. जागरूक पत्रकाराच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या तासाभरात आरोपीला ताब्यात घेतले.
Jewellery Theft Solved

Jewellery Theft Solved

esakal

Updated on: 

नारायणगाव : जागरूक पत्रकार व तत्पर पोलीस तपास या मुळे प्रवासी जेष्ठ महिलेचे नारायणगाव बस स्थानकातून चोरीला गेलेले 5 लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईलचा तपास अवघ्या एक तासात करून आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. ही घटना सोमवारी (ता. 9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नारायणगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी रमेश सुदंर भास्कर (वय 71,राहणार विठ्ठलवाडी- आगर, ता.जुन्नर ) या ज्येष्ठ नागरिकाला अटक केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे.

Loading content, please wait...