

नारायणगाव, ता. १० : कांदळी (ता. जुन्नर) येथील कला केंद्रात बारी लावण्याच्या वादातून गोळीबार करून फरार झालेल्या शिवशंकर मारुती हळदेकर (वय २८, रा. मेदनकरवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात तिसरी बारी लावण्यास नकार दिल्याने आरोपी हळदेकर आणि त्याच्या तीन साथीदारांनी व्यवस्थापक अक्षय धोंगडे व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या वेळी झालेल्या गोळीबारात फिरोज कादीर शेख हा तरुण जखमी झाला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने खेड परिसरातून हळदेकरला ताब्यात घेऊन नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
अटक केलेला हळदेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर केबल चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.