

A businessman from Warulwadi, Junnar, allegedly lost ₹1.93 crore in an online investment scam through fake apps promising high returns. Narayangaon Police have registered a case against 57 accused.
नारायणगाव : बनावट कंपनी ॲपच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून वारूळवाडी येथील व्यवसायिकाची १ कोटी ९३ लाख ३९ हजार ७८२ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी बनावट ॲप चालवणाऱ्या 57 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.