Summer Alert: Police & Irrigation Dept. Warn Students Against Swimming in Canals
Sakal
नारायणगाव : नुकतीच बल्लाळवाडी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.शाळांना 1 मे पासून उन्हाळी सुट्टी लागली आहे. तापमान व उन्हाची तीव्रता वाढली आहे. या परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना पाण्यात पोहण्याचा मोह होतो. यातून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने पालकांनी सतर्कता बाळगावी. शालेय विद्यार्थ्यांनी उघड्या पानवाठ्यावरील पाण्यात, कालव्यात किंवा धरणात पोहण्याचा मोह टाळावा. असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी केले आहे.