

Law Enforcement: Narayangaon Police Extern Notorious Criminal Montu Singh for One Year
esakal
नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झालेला सराईत आरोपी मोन्टु छोटेलाल सिंग( वय 30 रा. नारायणगाव, भैरवनाथ मंदीराजवळ ता. जुन्नर) यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये १३ मे २०२६ पासून पुढील एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.