

Tempo carrying electric car batteries catches fire on Pune Nashik Highway near Narayangaon causing loss of ₹5 lakh
Sakal
नारायणगाव : येथील पुणे नाशिक महामार्गावर मारुती सुझुकी शोरूम समोर चार्जेबल मोटारीच्या बॅटरीची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग लागली. आगीत बॅटऱ्या व टेम्पोचा मागील भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. वाहनाला आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पो वाहनाच्या कडेला उभा केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. ही घटना आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.