

नारायणगाव, ता. १७ : नारायणगाव वनपरीक्षेत्रातील वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चिमणवाडी येथील प्रशांत वारुळे यांच्या द्राक्षबागेत बुधवारी (ता.१६) रात्री साडेनऊ वाजता तीन बिबटे आढळून आले. येथील अजय कानडे यांनी बिबट्यांना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केले.
मांजरवाडी येथील मेंढपाळाच्या वाड्यावर बुधवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या. मागील आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर नारायणगाव वनपरीक्षेत्रात पुन्हा बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी ११ ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, बिबटे पिंजऱ्यातील भक्षाकडे फिरकत नसल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदवले आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त रात्रीच्या वेळी आयोजित कार्यक्रमाला ये-जा करताना काळजी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. उसाच्या शेताच्या पायवाटेने ये-जा करू नये, असे आवाहन वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी केले आहे.
संजय बनकर, अतुल कानडे, अजित कानडे हे त्यांच्या वाहनातून बुधवारी रात्री साडेनऊ वाजता डिंभे डावा कालव्याच्या उत्तर बाजूने चिमणवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांना प्रशांत वारुळे यांच्या द्राक्षबागेत एकाच ठिकाणी उभे असलेले तीन बिबटे आढळून आले. या भागात पाळीव जनावरांवर मागील काही दिवसांत बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता.१७) सायंकाळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, अपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी चिमणवाडी येथे पिंजरा लावला आहे.
08609
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.