
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या खटल्यात न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. मात्र या खुनामागचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. या सूत्रधारांना कधी पकडणार, असा संतप्त प्रश्न हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आणि अनिल वेल्हाळ यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत (अंनिस) उपस्थित केला आहे.