पुणे - काँग्रेसच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीत दलालांचा सुळसुळाट होता. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकार थेट शस्त्रखरेदी करत आहे. दलाली बंद झाल्याने दिल्लीतील हॉटेल ओस पडले आहेत, अशी टीका भाजपचे माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली..केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली. शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले यावेळी उपस्थित होते..जावडेकर म्हणाले, ‘१९८४ पासून देशात स्थिर सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. पण २०१४ पासून देशात नरेंद्र मोदी यांनी स्थिर सरकार दिले आहे. आता ११ वर्ष झाली असून, या सरकारची मुदत २०२९ पर्यंत आहे. भविष्यातही एनडीएचे स्थिर सरकार देशात असले.या ११ वर्षात सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ शकलेले नाहीत. पण काँग्रेसच्या काळात रोज एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. हे काम करणारे सरकार असल्याने भारत जगातील चार क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. ३० कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत..काँग्रेसच्या १० वर्षाच्या काळात ८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले होते. पण मोदींनी तब्बल ३० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. जनधन बॅंक योजनेमुळे प्रत्येकाला खाते मिळालेच, पण बँकांचा नफाही सहा पटीने वाढला आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य यासह अनेक क्षेत्रात देशाची मोठी प्रगती गेल्या ११ वर्षात झाली आहे.काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट होत होते, पण आता या घटना बंद झाल्या आहेत. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडा शिकवला आहे, असेही जावडेकर म्हणाले,.एनडीए सरकारची महत्त्वाची कामे- देशभरात १४२ वंदेभारत रेल्वे सुरु, २३ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरु- देशभरात ७० हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधले- आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षण दिले- यूपीआयमुळे डिजिटल क्रांती झाली, रोज ७ कोटी व्यवहार होत आहेत- ५५ कोटी नागरिकांचे जनधन बँक खाते निघाले- ५२ कोटी युवकांना मुद्रा कर्ज दिले.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.