PM Modi Pune Visit : चांद्रयान चंद्रावर उतरु दे, मोदींचे 'श्री गणेशा'कडे साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत सोडला संकल्प
Narendra Modi
Narendra ModiSakal

Pune News - अवघ्या पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या गणपतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दर्शन घेतले, यावेळी त्यांनी 'बाप्पा भारत विश्वगुरू होवो' आणि 'चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरू दे" असा संकल्प सोडत पुण्यातील त्यांच्या विविध कार्यक्रमांचा 'श्री गणेशा' केला!

तर दुसरीकडे ढोल ताशांचा गजर, "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष अन् आपल्या आवडत्या नेत्याला पाहण्याची डोळ्यांमध्ये आस घेऊन काही तास उभ्या असलेल्या पुणेकरांची मंगळवारची सकाळ अक्षरशः "मोदीमय" वातावरणाने झाली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी "लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार" कार्यक्रम, मेट्रो प्रकल्पाच्या नवीन मार्गिका व पंतप्रधान आवास प्रकल्पातील घरांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन नियोजित होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे दगडूशेठ मंदिरात गणपती दर्शनासाठी येणार असल्याने नागरिकांनी मोदी यांना पाहण्यासाठी अक्षरशः सकाळी 8 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, दगडूशेठ मंदिर परिसर व लक्ष्मी रस्त्यावर गर्दी केली होती. मोदी यांचे आगमन झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वरूपवर्धीनी ढोल ताशा पथकाने आपल्या बहारदार वादनाने वातावरण आणखी उत्साही केली.

...मोदी यांनी केली मनोभावे पूजा अन् सोडला 'भारत विश्व होऊ दे'चा संकल्प

पंतप्रधान मोदी यांचे ठीक 11 वाजून 17 मिनिटांनी दगडूशेठ मंदिर परिसरात आगमन झाले. "स्वरूप - वर्धीनी"च्या ढोल - ताशा पथकाने ढोल ताशावर पुण्यातील लोकप्रिय 'गावठी', 'तिसरा' हा ताल वाजवत मोदी यांच्या आगमनात उत्साह निर्माण केला.

त्यानंतर दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ यांच्या हस्ते मोदी यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व सरचिटणीस हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी यांना यावेळी गणपतीची चांदीची मूर्ती भेट देण्यात आली.

मोदी यांच्या हस्ते श्रीं" विधिवत पूजा व "सुखकर्ता दुःखहर्ता" व हिंदी भाषेतील आरती करण्यात आली. यावेळी मोदी यांनी यावेळी "बाप्पा भारत विश्वगुरू होवो" आणि "चांद्रयान चंद्रावर यशस्वी उतरू दे" असा संकल्प सोडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि पुण्यातील गणेशोत्सवाची माहिती दिली. त्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ते 11 वाजून 42 मिनिटांनी रवाना झाले.

कडक सुरक्षेमुळे नागरिक नाराज, 'गणपती बाप्पा मोरया!

शहरात काही दिवसांपूर्वी दहशतवादी आढलून आले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती, तर नागरिकांना ही दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 'मेट्रो उदघाटनवेळी इतकी सुरक्षा नव्हती, नागरिकांना देखील मोदी ताफा किमान दिसला होता" अशी चर्चा यावेळी रंगली होती. मोदी यांचा ताफा मंदिर परिसरात दाखल होताच, तक्रार करणाऱ्या नागरिकांचा सूर बदलला, आणि तत्काळ 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करीत त्यांनी मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com