

Narhari Zirwal and Tribal Development Minister Ashok Uike interact with tribal students during their ongoing protest in Pune.
esakal
पुणे : विविध १४ मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी परिसरात गेल्या १४ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी १५ विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.