Pranit Wabale
sakal
घोडेगाव - नारोडी (ता. आंबेगाव) येथील प्रणित भाऊसाहेब वाबळे यांनी सीएपीएफ यूपीएससी सीएफ असिस्टंट कमांडंट २०२५ या परीक्षेत भारतामध्ये ५२ वा रँक मिळवून यशस्वी झाला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी त्याचे वडिल, आई व बहिण यांच्या भक्कम पाठींब्यामुळे यश मिळविल्यामुळे त्यांचे अभिनंद केले आहे. प्रणितचा हा दुसरा प्रयत्न होता, मागच्या प्रयत्नामध्ये मला अपयश आलं होतं आणि यावर्षी त्याने जिद्दीने परीक्षेत बावन्नावा रँक प्राप्त केलेला आहे.