Motivation : दृष्टिहीन असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर गणेशची यशाला गवसणी

दृष्टिहीन असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ८४.६० टक्के गुण मिळवले.
Ganesh Tamkar
Ganesh Tamkarsakal

नसरापूर - कुरंगवडी (ता.भोर) येथील गणेश श्रीहरी तामकर याने दृष्टिहीन असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ८४.६० टक्के गुण मिळवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणेशने मिळवलेल्या यशाने सुतारकाम करणारे वडील श्रीहरी तामकर व शेतात मोल मजुरीचे काम करणारी आई आशा यांना आनंद झाला.

जन्मतःच दृष्टिहीन असलेल्या गणेशला शिकण्याची इच्छा असल्याने त्याला भोसरी येथील पताशीबाई लुंकड अंधशाळेत दाखल केले होते. तेथे होस्टेलवर राहून नववीपर्यंत शिक्षण घेतल्यावर भोसरीमधील शिवछत्रपती हायस्कूलमध्ये दहावीसाठी प्रवेश घेतला. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत गणेशने ब्रेललिपीच्या पुस्तकांवर अभ्यास करत लेखनिक घेऊन दिलेल्या परिक्षेत तब्बल ८४.६० टक्के गुण मिळवत अनेकांनी प्रेरणा दिली आहे.

Ganesh Tamkar
Sharad Pawar : राज्यातील नागरिकांनी शांतता बाळगण्याचे शरद पवार यांचे आवाहन

आई-वडील व तीन बहिणी असा परिवार गणेशचा आहेत. त्यातील प्राजक्ता ही दृष्टिहीन असून तिने पुण्यातील ज्ञानेश्वरी विद्यालयात शिकत दहावी पूर्ण केली. दहावीला तिला ८८ टक्के गुण आहेत. त्यानंतर सेंटमिरा कॉलेज कोरेगावपार्क येथे बारावीची परिक्षा देत ६५ टक्के गुण मिळवले. बी. एच्या पहिल्या वर्षात ती शिकत आहे. दुसऱ्या बहिणीचे लग्न झाले आहे. प्रियांका हिची बारावी झाली असून नसरापूर येथे रुग्णालयात अर्धवेळ काम करत वडिलांना हातभार लावत आहे.

Ganesh Tamkar
Pune News : महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी केल्या २५८ मिळकती सील

होस्टेलवर असल्याने मला अभ्यासास पुरेसा वेळ मिळाला. ब्रेल लिपीतील पुस्तके व आॅडिओ बुकच्या माध्यमातून अभ्यास केला. माझ्या यशात आई-वडील, बहिणी यांचा मोलाचा वाटा आहे. वर्गशिक्षिका विद्या कराळे, अंध शिक्षक राजू भगत यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष शांतिलाल लुंकड, शिक्षक दत्ता कांबळे, पांडुरंग साळुंखे यांनीदेखील वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याचे गणेश याने सांगितले.

- गणेश तामकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com