

नाशिक, ता. १६ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (नाशिक) १९ हजार २३१ उत्तरपत्रिका संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या व अनधिकृत शिक्षकांकडून तपासून घेत विद्यापीठासह विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा मूल्यमापन केंद्रावर हा प्रकार घडला. यासह विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार रुपयांचे मानधन लाटल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस स्थानकात महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप सेंटर संचालकांसह एकूण ४८ जणांविरुद्ध रविवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
याप्रकरणी मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा युनिट तीन व केंद्रीय मूल्यमापन कक्ष, नाशिक) मनोज नारायण घंटे (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा सर्व गैरप्रकार गतवर्षी २०२५ मध्ये नऊ जून ते चार जुलै या कालावधीत घडला. विद्यापीठाने छत्रपती शाहू महाविद्यालयातील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर काही अधिकृत प्राध्यापकांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, संशयित आरोपींनी आपापसांत संगनमत करून अधिकृत प्राध्यापकांचा केवळ बायोमेट्रिक अंगठा घेतला आणि उत्तरपत्रिका तपासण्याची ऑनलाइन लिंक व साइट उघडली.
प्रत्यक्षात अधिकृत प्राध्यापक केंद्रावर उपस्थित नसतानाही, तेच पेपर तपासत असल्याचा भास निर्माण करणारे बनावट आयडी तयार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.