

नाशिकमध्ये१,५०० ते २,५०० रुपये
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरात वांग्याच्या बाजारभावात मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून, बुधवारी (ता. २४) दरात अचानक मोठी घसरण झाली. मंगळवारी सर्वसाधारण ४,००० रुपये प्रतिक्विंटल असलेला दर बुधवारी थेट २,००० रुपयांवर आला. त्यामुळे एका दिवसातच तब्बल दोन हजार रुपयांची घसरण नोंदली गेली.
गेल्या सात दिवसांचा कल पाहता वांग्याच्या बाजारभावावर मागणी-पुरवठ्याचा थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंगळवारी कमी आवक असल्यामुळे दर तेजीत होते. परंतु बुधवारी मागणी घटल्याने दरात मोठी घसरण झाली. बुधवार (ता. २४) रोजी वांग्याची आवक १५३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते २,५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होते.मंगळवार (ता. २३) रोजी वांग्याची आवक १४० क्विंटल झाली.त्यास २,५०० ते ६,००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४,००० रुपये राहिला.
सोमवार (ता. २२) रोजी आवक १६७ क्विंटल झाली. त्यास ३,००० ते ५,००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४,२०० राहिला. रविवार (ता.२१) रोजी आवक १३८ क्विंटल झाली. त्यास ३,५०० ते ५,००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४,५०० राहिला.
शनिवार (ता. २०) रोजी आवक १५० क्विंटल झाली. त्यास ३,५०० ते ५,००० असा दर मिळाला सर्वसाधारण दर ४,५०० राहिला. शुक्रवार (ता. १९) रोजी आवक १७१ क्विंटल झाली. त्यास ३,००० ते ५,००० असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ४,००० राहिला. गुरुवार (ता. १८) रोजी आवक १७२ क्विंटल झाली. त्यास २,५०० ते ४,५०० असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ३,५०० राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.