पूर्ण होण्याआधीच उखडला नाशिक मार्ग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

स्थानिकांमुळेच कामास विलंब
ठेकेदार संतोष घोलप म्हणाले, ‘‘नारायणगाव बाह्यवळणाचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र काम सुरू असताना शेतकरी, स्थानिक नागरिक सातत्याने अडथळा आणत आहेत. बाह्यवळणाचे सर्वेक्षण, अंदाजपत्रक करताना खोडद व पाटेखैरे मळा रस्त्यावर उड्डाण पूल नाही. मात्र आता उड्डाण पुलाची मागणी होत आहे. यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यात अडचण येत आहे.’

नारायणगाव - पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव ते आळेफाटादरम्यान काही भागात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण व उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, निकृष्ट दर्जामुळे काम पूर्ण होण्याच्या अगोदरच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबराचा वरचा थरच निघून गेला आहे. त्यामुळे रस्ता खालीवर झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत असल्याची चालकांची तक्रार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अपघात टाळण्यासाठी रस्ता समपातळीत करावा. किमान उर्वरित काम चांगल्या दर्जाचे करावे. वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी कासव गतीने सुरू असलेले बाह्यवळणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

खेड ते सिन्नरच्या दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने २०१४ मध्ये सुरू केले. भूसंपादनाअभावी पुणे जिल्ह्याच्या हद्दीत खेड ते आळेफाटादरम्यान चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. नारायणगाव येथे सुमारे पाच किलोमीटर लांबीचा बाह्यवळण आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Highway Issue