

नाशिक रोड स्थानकात
दीड कोटींची रोकड जप्त
नाशिक, ता.१३ : छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी संदीप बाळासाहेब भामरे (वय २४, रा. गोमवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. रोकडच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती व वैध कागदपत्रे सादर करता न आल्याने रोकड आणि तरुणाला पुढील तपासासाठी आयकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.
१२ नोव्हेंबरला नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर २२११२ क्रमांकाची अमृत भारत एक्स्प्रेस दाखल होत असताना आरपीएफचे जवान तपासणी करीत होते. यावेळी जळगावहून मुंबईकडे बॅग घेऊन जाणाऱ्या संदीप भामरे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानांनी त्याला थांबवून चौकशी केली. बॅगेतील साहित्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपनिरीक्षक लवकुश वर्मा आणि सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव यांनी पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी केली. त्यात पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे गठ्ठे आढळले. मोजणीअंती १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.