Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे आणखी कठोर शिक्षेस पात्र : न्यायालय

आरोपीने केलेल्या कृत्यास कायद्याने मृत्युदंड ही अंतिम शिक्षा दिली आहे. मात्र त्याने जे कृत्य केले त्याला तो आणखी कठोर शिक्षेस पात्र आहे, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.
Nasrapur Case Verdict

Nasrapur Case Verdict

Esakal

Updated on: 

आरोपीने केलेल्या कृत्यास कायद्याने मृत्युदंड ही अंतिम शिक्षा दिली आहे. मात्र त्याने जे कृत्य केले त्याला तो आणखी कठोर शिक्षेस पात्र आहे, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. निकाल वाचून झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीचे नाव उच्चारल्याने तो पुढे आला. त्या वेळी न्यायालयाने त्याला सांगितले की, ‘भीमराव कांबळे, आता फासावर चढावे लागेल.’

अकार्यक्षम तपास, प्रक्रियात्मक अडथळे आणि न्यायालयांमधील अतिविलंब यामुळे जनमानसात तीव्र संताप निर्माण होतो. अनेकदा खटला सुरू होईपर्यंत तपास अधिकारी बदलतात किंवा साक्षीदार मृत पावतात. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विस्मरण होते आणि आवश्यक ते पुरावे सादर होण्यात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे फौजदारी खटला केवळ एक औपचारिकता बनून राहतो, असे न्यायालयाने नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com