

Public Outrage: Velhe and Panshet Markets Shut Down Over Nasrapur Incident
Sakal
वेल्हे : नसरापूर (ता.भोर) येथे एका अल्पवयीन पीडित मुलीच्या संदर्भात घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचे पडसाद आज राजगड तालुक्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज वेल्हे आणि पानशेत येथील व्यापारी व ग्रामस्थांनी आपल्या बाजारपेठा कडकडीत बंद ठेवल्या. तर तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे पुकारण्यात आलेल्या या बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, ठिकठिकाणी निदर्शने करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.