

Fast-Track Trial: Special Court Conducts Daily Hearings in Nasrapur Minor Assault Case
esakal
पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात विशेष न्यायालयात शनिवारी (ता. ३०) आणखी दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीचा शोध घेणारे तसेच घटनास्थळाशी संबंधित पुरावे समोर आणणाऱ्या साक्षीदारांचा न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला.