दुचाकींच्या अपघातात सोनवडीचा तरुणाचा मृत्यू

दुचाकींच्या अपघातात सोनवडीचा तरुणाचा मृत्यू
Published on

नसरापूर, ता. ११ : नसरापूर-वेल्हा रस्त्यावर सांगवी (ता. भोर) गावाच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ज्ञानेश्‍वर दत्तात्रय दमिष्टे (वय २१, रा. सोनवडी, ता. भोर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी बांधकाम ठेकेदार आकाश सुभाष पवार (वय २८, रा. आंबवणे, ता. राजगड) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्टला सकाळी नऊच्या सुमारास पवार यांचे कामगार दिनेश कुमार व संजय कुमार हे दुचाकीवरून (क्र. एम एच २३ बीएम ९६४७) आंबवणे येथून टापरेवाडीकडे चालले होते. सांगवी गावच्या हद्दीत ज्ञानेश्‍वर दमिष्टे याने दुचाकी (क्र. एम एच १२ बी यु ७४८२) भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्‍वरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर दिनेश व संजय यांच्या हातापायाला जखमा झाल्या. ज्ञानेश्‍वरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी (ता. ९) राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार औदुंबर अडवाल पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com