Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

सीसीटीव्ही, डीएनए अहवाल, शवविच्छेदन व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे ३९ मिनिटांत झालेल्या अत्याचारांची साखळी न्यायालयात उलगडली; सरकारी पक्षाने आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली
The 39-Minute Chronology: CCTV as a Decisive Technical Proof

The 39-Minute Chronology: CCTV as a Decisive Technical Proof

esakal

Updated on

पुणे : नसरापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याने मुलीला घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजून १२ मिनीटांनी घटनास्थळाकडे नेले. त्यानंतर, दुपारी तीन वाजून ५१ मिनीटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचे तेथील सीसीटीव्हीच्या चित्रिकरणातून दिसून येते. या तांत्रिक पुराव्यावरून मुलगी तब्बल ३९ मिनीटे आरोपीच्या ताब्यात होती हे सिद्ध होते. त्या वेळेत त्याने मुलीवर अत्याचार केला व तिचा खून करून मृतदेह लपवून ठेवल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आज न्यायालयास दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com