

नसरापूर, ता. १३ : नसरापूर (ता. भोर) येथील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मावळत्या सरपंच उषा कदम यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे केली आहे.
गावातील सांडपाणी लेंडी ओढ्याद्वारे शिवगंगा नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्य व पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, उषा कदम यांनी आमदार मांडेकर यांना निवेदन देऊन शास्त्रोक्त सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेमार्फत निधी देण्याची विनंती केली. आमदारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री व जिल्हा परिषदेकडे निधीसाठी पत्रव्यवहार केला आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या दंडामुळे प्रकल्पास गती
‘‘नसरापूरच्या शिवगंगा नदी व लेंडी ओढा यामध्ये थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याचे निदर्शनास आल्याने राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र राज्य प्रदूषणनियंत्रण मंडळाकडून ग्रामपंचायतीस ७९ लाख ६२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नसरापूरसाठी एसटीपी प्रकल्प मंजूर झाल्यास झालेला दंड माफ होण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’’ असे ग्रामविकास अधिकारी रूपेश हारपुडे यांनी सांगितले.
मावळत्या कार्यकारिणीने ‘स्वच्छ नसरापूर, सुंदर नसरापूर’ अंतर्गत हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.