माळशिरस येथे एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी

माळशिरस येथे एकनाथ षष्ठी उत्साहात साजरी
Published on

माळशिरस : नाथषष्ठी निमित्त कीर्तन करताना भागवत महाराज जाधव.

नाथषष्ठीनिमित्त भागवत महाराज जाधव यांचे कीर्तन
माळशिरस, ता. ९ : येथील श्री रामदेव-श्री मारुती देव मंदिरात नाथषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी हभप भागवत महाराज जाधव (खोरोची) यांनी कीर्तन सेवा सादर केली.
सकाळी दहा ते बारा या वेळेत झालेल्या कीर्तनात त्यांनी संत एकनाथ महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. त्यानंतर दुपारी बारा वाजता एकनाथ महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नाथषष्ठी साजरी केली. कार्यक्रमासाठी भाविक व नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमानंतर ॲड. मिलिंद कुलकर्णी यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com