मलकापूर रोटरी नेशन आवड
शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड
मलकापूर रोटरी क्लबकडून गौरव; चौघांना पुरस्कार
मलकापूर, ता. १२ : राष्ट्र घडविण्याची खरी जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर असते, या विचाराला अधोरेखित करून येथील रोटरी क्लबने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड २०२६’ हा पुरस्कार प्रदान केला.
या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आगाशिवनगर येथील वैशाली दुर्वास भोसले, वडगाव हवेलीच्या यशवंत खाडे, कोयना वसाहत- गोपाळनगरमधील मनीषा पवार, विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षिका प्रियांका चव्हाण यांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास कथाकथनकार जयवंत आवटे उपस्थित होते. या वेळी क्लबचे अध्यक्ष राहुल जामदार, सचिव विजय दुर्गावळे, समन्वयक दिलीप संकपाळ, संस्थापक अध्यक्ष रोटरी विजय चव्हाण, विलासराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मलकापूर व कऱ्हाड परिसरातील शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
......
A01287
मलकापूर : रोटरी नेशनल अवॉर्ड प्रदानप्रसंगी जयवंत आवटे. त्या वेळी राहुल जामदार, विजय दुर्गावळे आदी.
.......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

