

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन
रुग्णसुरक्षा, स्वच्छता अन् सेवांच्या गुणवत्तेची तपासणी; ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला बळ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३१ : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्यसेवा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांचे विविध निकषांवर मूल्यांकन करून हे मानांकन दिले जाते.
या प्रक्रियेत आरोग्य संस्थांचा दर्जा, रुग्णसुरक्षा, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषधे व उपकरणांचे व्यवस्थापन, प्रशासन आणि आरोग्यसेवांचे मूल्यांकन केले जाते. मानांकन मिळालेल्या संस्थांना गुणवत्ता प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या निधीतून पायाभूत सुविधा आणि रुग्णसुविधा बळकट करण्यास मदत होते. तसेच औषधे, उपकरणे, अभिलेख व्यवस्थापन आणि रुग्णांचे समाधान यांत सुधारणा करण्यावर भर दिला जातो.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक निखिल फताटे आणि त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांतून ही कामगिरी साध्य झाली.
-------------------------------
कोट
जिल्ह्यातील ५० आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन मिळणे ही अभिमानाची बाब आहे. उर्वरित आरोग्य संस्थांनाही हे मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
— कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.