

pune news
भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून रुग्णवाहिका सेवा क्षेत्रातील गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यात यशस्वीरित्या पूर्ण झाला. १३ ते १५ मे या कालावधीत पार पडलेल्या या विशेष उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील प्रतिनिधींचा मोठ्या उत्साहाने सहभाग दिसून आला.