राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा २४ ऑक्टोबरला

राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
National Cognitive Examination
National Cognitive ExaminationSakal

पुणे - राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) मार्फत जून मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतू, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता या महिन्यात ही परीक्षा पार पडत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

एनसीईआरटीच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे प्रवेश पत्र शुक्रवार (ता.८) नंतर संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनच्या माध्यमातून हे प्रवेशपत्र प्राप्त करावेत. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी https://ncert.nic.in/national-talent-examination.php या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सुपे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com