Katraj Dairy
Katraj Dairysakal

पुणे : कात्रज डेअरीवर पुन्हा घड्याळाचाच गजर

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ जागांपैकी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने १४ जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे कात्रज डेअरीवर पुन्हा घड्याळाचाच गजर झाला आहे. उर्वरित दोन जागांपैकी एक जागेवर कॉंग्रेसने तर, दुसऱ्या जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. मावळत्या संचालक मंडळातील दोघांचा पराभव झाला आहे. मात्र यापैकी रामचंद्र ठोंबरे या संचालकांनी ऐनवेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचा केवळ तांत्रिक पराभव मानला जात आहे.

नवीन संचालक मंडळात हवेली तालुका मतदारसंघातील गोपाळ म्हस्के हे सर्वात ज्येष्ठ तर, शिरूर तालुका मतदारसंघातील स्वप्नील ढमढेरे हे सर्वात तरुण संचालक ठरले आहेत. दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे (आंबेगाव) यांच्यासह गोपाळ म्हस्के, दिलीप थोपटे (भोर), बाळासाहेब खिलारी (जुन्नर), केशरबाई पवार आणि भगवान पासलकर (वेल्हे) हे संचालक पुन्हा निवडून आले आहेत. मावळत्या पंचवार्षिकमध्ये पावणेपाच वर्षे संचालक असलेले आणि शेवटच्या तीन महिन्यात तां६का कारणाने संचालक पद रद्द झालेले बाळासाहेब नेवाळे (मावळ) पुन्हा निवडून आले आहेत.याशिवाय विद्यमान उपाध्यक्षा वैशाली गोपाळघरे यांचे पती कालिदास गोपाळघरे, संचालक रामदास दिवेकर यांचे चिरंजीव राहुल दिवेकर (दौंड), बाळासाहेब ढमढेरे यांचे चिरंजीव स्वप्नील ढमढेरे (शिरूर) हे निवडून आले आहेत.

खेड तालुका मतदारसंघातून विद्यमान संचालक चंद्रशेखर शेटे यांचा पराभव झाला आहे. येथून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती अरुण चांभारे निवडून आले आहेत. या चार नवीन चेहऱ्यांसह लता गोपाळे (महिला राखीव), भाऊ देवाडे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), निखिल तांबे (विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघ), मारुती जगताप (पुरंदर) आणि चंद्रकांत भिंगारे हे नऊ नवीन चेहरे निवडून आले आहेत.

संचालक मंडळाच्या १६ पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या ११ जागांसाठी रविवारी (ता.२०) मोठ्या चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यात पैकीच्या पैकी (१०० टक्के) मतदान झाले होते. सोमवारी (ता.२१) सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरू झाली आणि मतमोजणीनंतर लगेच मतदारसंघनिहाय निकाल जाहीर करण्यात आल्याचे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी बाळासाहेब तावरे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडणूक निकालाची ठळक वैशिष्ट्ये

  • रामचंद्र ठोंबरे, चंद्रशेखर शेटे या दोन संचालक पराभूत

  • भोरमधून कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव

  • झेडपीचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे दोन मतदारसंघातून पराभूत

  • विद्यमान सहा संचालकांचा पुन्हा विजय

  • संचालकांचे तीन नातेवाईक विजयी

  • अरुण चांभारे आणि बाळासाहेब नेवाळे या दोन माजी संचालकांचा विजय

  • शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील ढमढेरे विजयी

    जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील लढविण्यात आलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती वर्चस्व स्थापित केले आहे. या संचालक मंडळातील १६ पैकी १४ जागा जिंकल्या असून, उर्वरित दोन्ही संचालकही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांचे आहेत. जिल्हा बॅंकेच्या पाठोपाठ दूध संघही ताब्यात ठेवण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत.

प्रदीप गारटकर,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com