
पुणे - एकतर्फी प्रेमातून तेरावर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा गळा चिरून खून प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या फिर्यादीने आरोपीला ओळखले आहे. आरोपी शुभम ऊर्फ हृषिकेश भागवत यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरल्याची साक्ष फिर्यादीने दिली.