विंग. परी रणसिंग व यशराज कदम नेमबाजी चमकले
परी रणसिंग, यशराज कदमचे नेमबाजीत यश
विंगच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर चमक, कुस्तीत ओंकार कणसे द्वितीय
विंग, ता. ५ : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी परी विकास रणसिंग हिने भोपाळ येथे झालेल्या ६८ व्या नॅशनल रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. याद्वारे इंडियन ट्रायलसाठी निवड सार्थ ठरवली. तिच्या गुणवत्तेची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
आठवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या परीने देशभरातून आलेल्या नामांकित नेमाबाजांशी स्पर्धा केली. एकाग्रता आणि अचूक नेमबाजीचे दर्शन घडवत निशाणा साधला. दरम्यान दिल्ली येथे झालेल्या ६८ व्या रायफल शूटिंग स्पर्धेत प्री नॅशनल स्पिस्टल सब-युथ मॅन क्रीडा प्रकारात यशराज प्रमोद कदम (इयत्ता आठवी) यानेही यश मिळवले. यासह जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत ओंकार संतोष कणसे या नववीच्या विद्यार्थ्याने ३८ किलो वजन गटात ग्रीक रोमन विभागांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक बी. बी. कुंभार, आर. पी. कांबळे, एस. एन. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. आर. फकीर, उपमुख्याध्यापक एस. डी. सवाखंडे, पर्यवेक्षक श्रीकांत सावंत, कार्यालयीन प्रमुख श्रीशैल चव्हाण, शाळा व्यावस्थापन समिती, शाळा विकास समिती, माजी विद्यार्थी संघ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फोटो :..........WIN26B02125
फोटो :..........WIN26B02124
-----------------------------------------------------------
विलास खबाले.....13:24 04-01-2026
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

