डेक्कन कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय संस्कृतदिन’ समारंभ

संस्कृत भाषा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा : मंगला कवठेकर
pune
punesakal

पुणे : ‘‘संस्कृत भाषा क्षेत्रामध्ये काम करणे आव्हानात्मक असले, तरीही संस्कृतचा आधुनिक काळामध्ये उपयोग करण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक आहेत. मात्र सरकारने त्यासाठी या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने रोजगार निर्माण होऊ शकला, तर संस्कृतचे संवर्धन व प्रसार होण्यास खूप मोठा हातभार लागेल’’, असे मत संस्कृत वृत्तनिवेदिका मंगला कवठेकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) संस्कृत व कोशशास्त्र विभागामध्ये राष्ट्रीय संस्कृतदिन’ समारंभ नुकताच झाला. संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत वृत्तनिवेदन या क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात त्यांच्याशी संस्कृतकोशशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. हरी पालवे आणि संहिता जोशी-रानडे यांनी कवठेकर यांच्याशी संवाद साधला. कवठेकर म्हणाल्या,‘‘संस्कृत ही अतिशय सोपी आणि सुगम अशी भाषा आहे.

ती प्राचीन असूनही तितकीच कालानुरूप बदलणारी आणि आजही व्यवहार्य अशी भाषा आहे, हे जनमानसामध्ये रुजविण्यासाठी १९७४ साली आकाशवाणीवर संस्कृतवार्तांना सुरवात झाली. संस्कृतवार्तांच्या अनुवादाचे, संपादनाचे काम करताना अनेक इंग्रजी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द तयार करणे, भिन्न-भिन्न कार्यक्षेत्रातील संज्ञांसाठी संस्कृत शब्दांची निर्मिती करणे याचबरोबर वार्तांकनातील संस्कृत सोपी आणि प्रवाही ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी संस्कृत अनुवादक आणि निवेदक यांच्यावर असते.’’

दृकश्राव्य माध्यमांमधून संस्कृतच्या प्रसारकार्यासाठी विविध विद्यापीठांमधून संस्कृत पत्रकारितेसारखा अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता असल्याचे कुलपती डॉ. अरविंद जामखेडकर यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे आणि उपकुलगुरू व संस्कृतकोशशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली भोसले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com