वाडा येथे वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी मार्गदर्शन

वाडा येथे वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी मार्गदर्शन

Published on

चास, ता. १ : वाडा (ता. खेड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि ॲड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी थोर विज्ञान संशोधक डॉ. सी. व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी मुलींनी विज्ञानावर आधारित सादर केलेले गीत कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आरोग्य विभागातील निवृत्त प्रयोगशाळा निरिक्षक नवनाथ लोंढे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी मार्गदर्शन केले व वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगाचे मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन करत विज्ञान दिवसाचे महत्त्व यातून पटवून दिले. प्रसंगी आनंदी कोहिनकर, आत्मजा बोऱ्हाडे या विद्यार्थिनींनी विज्ञानाचे महत्त्व सांगितले. तर गौरी वाडेकर, पूर्वा कदम, सिद्धांत कोरडे, श्रीधर वाडेकर या मुलांनी अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित प्रयोग केले. विज्ञान शिक्षिका जयश्री गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी वैज्ञानिक प्रयोगा विषयी वेगवेगळे वैज्ञानिक मॅडेल तयार केले होते. त्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ काळू ढेगळे, पराग शिवदास, योगेश सोनवणे, उमेश कोळी, सुदाम असवले, प्रकाश साबळे, राजू हुंडारे, माया घोटेकर, शीतल कानडे, सुशीला मुळूक, लक्ष्मी गोंदके उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास लोखंडे यांनी तर आभार परवीन इनामदार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com