विज्ञान चित्रकला स्पर्धेत 
अर्शीन शेख प्रथम

विज्ञान चित्रकला स्पर्धेत अर्शीन शेख प्रथम

Published on

मंचर, ता. २५ : आयुका पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६ निमित्त आयोजित विज्ञान विषयक चित्रकला स्पर्धेत अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालयातील अर्शीन शेख (इयत्ता ९वी) या विद्यार्थिनीचा आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक आला. तिने विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे, असे विद्यालयाचे मुख्याध्यापक धीरज कोळेकर यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील १४ विद्यालयातील ४० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. अवकाशातून पृथ्वी कशी दिसते यासंदर्भात अर्शीनने कल्पकता, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर चित्र रेखाटले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आयुका सेंटर, पुणे येथे स्पर्धेचे आयोजक प्रा. नीलेश पोखरकर यांच्या हस्ते झाला. अर्शीनला सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
जयराम मटाले, चेतन मंडलिक, योगिता देवतळे, नंदा केंगले, नितीन भोते, कविता भवारी, अश्विनी गेंगजे यांच्यासह कलाशिक्षक दिलीप चौधरी यांचे मार्गदर्शन अर्शीनला लाभले.
विद्यालय स्थानिक शाळा समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक-पालक संघ व सखी सावित्री समितीच्या वतीने अर्शीनचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com