जागतिक तापमानवाढ ते सेंद्रिय शेती; विज्ञान दिनी विद्यार्थिनींची प्रभावी मांडणी (पानीव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा)

जागतिक तापमानवाढ ते सेंद्रिय शेती; विज्ञान दिनी विद्यार्थिनींची प्रभावी मांडणी (पानीव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा)

Published on

BON26B01889
पानीव (ता. माळशिरस) : येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसह मान्यवर.

पानीव येथे विज्ञान दिन
विविध उपक्रमांनी साजरा
........
बोंडले, ता. ४ : पानीव (ता. माळशिरस) श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाचा विज्ञान दिन विज्ञानातील महिला : विकसित भारताचे प्रेरणास्थान या संकल्पनेवर आधारित होता. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाची प्रगती आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञानाचा प्रभावी उपयोग यावर विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांतून प्रकाश टाकला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आकर्षक भित्तिपत्रके, रांगोळी स्पर्धा, प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, नमुना प्रतिकृती सादरीकरण तसेच वैज्ञानिकांच्या जीवनावर आधारित भूमिकानाट्य सादर केले. कार्यक्रमास श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. सुभाष घुले, प्राचार्य विनोद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अहिल्यादेवी कोळेकर व प्रा. स्वप्नाली चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव ॲड. अभिषेक पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तृप्ती कांबळे हिने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com