

वडगाव मावळ, ता. ३ : निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पाचवी ते सातवीमधील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात लार्सन अँड टुब्रो कंपनीचे स्वयंसेवक तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये सहभागी होत कल्पकता, नवनिर्मिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा वापर करून आकर्षक विज्ञान मॉडेल्स सादर केली. तसेच विज्ञान रांगोळी स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपली सर्जनशीलता प्रदर्शित केली. विजेत्यांना कंपनीतर्फे सन्मानपदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘विज्ञान सेल्फी पॉइंट’चा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवृंद, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे पदाधिकारी, सीएसआर स्वयंसेवक, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.