वाचू आनंदे

वाचू आनंदे
Published on

लोगो - वाचू आनंदे

कथा राष्ट्रीय मूल्यांच्या

दोस्तांनो, तुम्हा सर्वांना शाळेत परिपाठ किंवा मूल्यशिक्षणाचा तास असेलच! आपल्या आयुष्यात मूल्यांचे महत्त्व खूप आहे. मूल्ये आपल्याला चांगल्या सवयी लावतात, आपल्या मनात चांगल्या भावना निर्माण करतात आणि आपल्याला चांगले नागरिक होण्यासही मदत करतात. डॉ. संजय जगताप यांनी अशा प्रकारच्या राष्ट्रीय मूल्यांचे महत्त्व कथांच्या माध्यमातून ‘कथा राष्ट्रीय मूल्यांच्या’ या पुस्तकाद्वारे सांगितले आहे.
लाडोबा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, श्रमप्रतिष्ठा यांसारख्या १० मूल्यांचा समावेश असून, त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या कथा डॉ. जगताप यांनी लिहिल्या आहेत.
केवळ उपदेशपर माहिती न देता रोजच्या जगण्यातील उदाहरणे देत, साधी भाषाशैली आणि सोप्या संवादांचा वापर करून त्यांनी लेखन केल्याने ते मुलांना पटकन कळते व आवडतेसुद्धा. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com