महिला आयोग घेणार ५०० ठिकाणी जनसुनावणी

महिला आयोग घेणार ५०० ठिकाणी जनसुनावणी

Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय महिला आयोग येत्या आठ ते १४ मार्च या कालावधीत देशातील पाचशे जिल्ह्यांत महिलांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनसुनावणी घेणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रात तीन ठिकाणी जनसुनावणी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांवरील अत्याचार थांबवावेत, त्यांना न्याय मिळावा आणि कामाची समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आयोग काम करीत असल्याचे सांगत रहाटकर म्हणाल्या की, मागील काही काळापासून नियमित सुनावणी आणि जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांची सोडवल्या जात आहेत. महिला दिनानिनित्त राज्य महिला आयोगांच्या सहकार्याने देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनसुनावणी घेतली जाणार आहे. या जनसुनावणीमध्ये १५ हजारपेक्षा जास्त तक्रारी ऐकून घेत त्यावर मार्ग काढला जाणार आहे. मी स्वत: सोमवारी (ता.९) जयपूरला जाणार आहोत. त्यानंतर बडोदा, भोपाळ, मडिक्कल, देवघर आणि दुमका या शहरांत जात तेथील महिलांच्या तक्रारी ऐकून घेणार आहोत.

देशभरातील महिलांसाठी काम
राष्ट्रीय महिला आयोगाच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आलेल्या संवाद केंद्राचे उद्‍घाटन रहाटकर यांच्या हस्ते झाले. ‘‘राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय दिल्लीत असल्यामुळे ही संस्था या भागापुरती मर्यादित असल्याचा लोकांचा समज आहे. तथापि देशभरातील महिलांसाठी ही संस्था काम करीत असून महिलांना न्याय आणि सुरक्षा प्रदान करत असल्याचे रहाटकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com